भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल कानडें बोलूं जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे

viththal kanaden bolun jane | tyachi bhasha pundalik nene

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठ्ठल कानडें बोलूं जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे ॥१॥ युगें अठ्ठावीस झालीं । दोघां नाहीं बोला बोली ॥२॥ कर टे-वूनि कटावरी । उभा भिंवरेच्या तिरीं ॥३॥ नामा ह्मणे स्वामि माझा । उभा भक्तांचिया काजा ॥४॥