भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल आमुचें सुखाचेम जीवन । विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा

viththal amuchen sukhachem jivan | viththal smaran premapanha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठ्ठल आमुचें सुखाचेम जीवन । विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ॥१॥ विठ्ठलचि ध्यावों विठठलचि गावों । विठ्ठलचि पाहों सर्वांभूतीं ॥२॥ विठ्ठलापरतें न दिसे सर्वथा । कल्प येतां जातां गर्भवास ॥३॥ नामा म्हणे चित्तीं आहे सुखरूप । संकल्प विकल्प मावळती ॥४॥