भजनी मालिका
← भजनांकडे परत

अजन्मा जन्मला अहंकार बुडाला

ajanma janmala ahankar budala

अजन्मा जन्मला अहंकार बुडाला । बोध पै ऊठिला गोकुळीं रया ॥ १ ॥ आपरूपे गोकुळीं आपरूपें आप । अवघेंचि स्वरूप हरिचें जाणा ॥ २ ॥ रूपाचें रूप सुंदर साकार । गोकुळीं निर्धार वृंदावनीं ॥ ३ ॥ निवृत्तीचें पुण्य वेणु वाहे ध्वनि । जनमनमोहनि एकरूप ॥ ४ ॥