भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदीं तोचि शास्त्रीं सर्वांठायीं तोचि । पुराणांत तोचि अंत:करणीं

vedin tochi shastrin sarvanthayin tochi | puranant tochi ant:karanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेदीं तोचि शास्त्रीं सर्वांठायीं तोचि । पुराणांत तोचि अंत:करणीं ॥१॥ नाम सदा ध्यायीं नाम सदा ध्यायीं । रामनाम ध्यायीं अरे मना ॥२॥ नामा म्हणे देह नाहीं पुनरुपें । केशवनाम सोपें उच्चारीं बापा ॥३॥