भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदांवेगळें कर्म करी । मनीं पाखंड धरी । तो पचिजे अघोरीं । चिरकाळ वरी

vedanvegalen karma kari | manin pakhand dhari | to pachije aghorin | chirakal vari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेदांवेगळें कर्म करी । मनीं पाखंड धरी । तो पचिजे अघोरीं । चिरकाळ वरी ॥१॥ तो न आणावा पैं दृष्टी । तोचि दोशी एक या सृष्टी । तो होईल महा कष्टी । हरीसिन भजतां ॥२॥ संध्या स्नान नेणे दान । नेणे हरिकथा श्रवण । तोहि पतीत जाण । महापातकी चांडाळ ॥३॥ सांडूनि ब्राह्मणपण । शूद्ररीती आच-रण । तो दृष्टी पडलिया जाण । पहादोष घडेल ॥४॥ निंदा करी जो संतांची । पूजा नेणे जो देवाची । तोचि राशि पापाची । प्र-त्यक्ष जाणावी ॥५॥ तीर्थ न करी हिंडतां । व्रत न करी बोलतां । पुराण नायके पाहतां । तो तंव राक्षस जाणावा ॥६॥ सदा अमं-गळ अशुची । गुरु आज्ञा भंगी साची । अखंद निंदा करी सं-तांची । तो स्वामिद्रोही जाणावा ॥७॥ कपट शिके नानाविध । गोत्रजांशीं करी विरोध । तो जाणावा हें प्रसिद्ध । महापातकी चां-डाळ ॥८॥ गृहदारावरी नाहीं चित्त । परस्त्रियेसीं करी स्तुत । तो प्रत्यक्ष महा दैत्य । त्याचें मुख पाहों नये ॥९॥ नाठवी जो उप-कार । स्वामीसी न करी जो नमस्कार । तो जन्मांतरचिं होय नर । पतीत चांडाळ बोलिजे ॥१०॥ पाखांड रची कवित्व । माता पितियाचें न करी महत्व । पंच पातकी जीवित्व । तो पूर्वीचा बोका होता ॥११॥ नामा म्हणे तैसे दोषी । न आणावे पंढरीसी । काय करावे ते पाषाण जन्मासी । जे विठ्ठलनामासी मिळतीना ॥१२॥