भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेदांसी अगोचर परब्रह्म कारण । योगिया ह्लदयींचें ममत्व निर्वाण । आकळूं न कळेचि शेखीं धरियेलें मौन । तें रूप पंढरीये विटे समचरण

vedansi agochar parabrahma karan | yogiya hladayinchen mamatva nirvan | akalun na kalechi shekhin dhariyelen maun | ten rup pandhariye vite samacharan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वेदांसी अगोचर परब्रह्म कारण । योगिया ह्लदयींचें ममत्व निर्वाण । आकळूं न कळेचि शेखीं धरियेलें मौन । तें रूप पंढरीये विटे समचरण ॥१॥ कानडा विठ्ठलवो । उभा भिवरेतीरीं । भक्तांचें आर्तवो जीवा लागलें भारी ॥धृ०॥ भूवैकुंठ पंढरी हे देवें रचियली पैं गा । शिवें ती वंदियेली विठो सम चरणांची गंगा । सदाचा नामघोषु कलिमल जाय भंगा । काय वानूं सुख तेथिंर्चे । भेटिलिया पांडुरंगा ॥२॥ विठठल नाम वाचे जना हाचि उपचारू । ह्मणवूनि दावि तुझे कटीं ठेवूनियां करू । येरासी मायानदी काम क्रोध मगरू । ठेवा हा नामयाचा स्वामि विठ्ठल वीरू ॥३॥