भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाट पाहें वाहे निडळीं ठेवुनियां हात

vat pahen vahe nidalin thevuniyan hat

वाट पाहें वाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥ कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥ डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे । मन उतावळि भाव सांडुनियां देहे ॥२॥ सुखसेज गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तहान पळाली भूक ॥३॥ तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥४॥