भजनी मालिका
← भजनांकडे परत

वासुदेवा हषिकेशा माधवा मधुसूदना । करिताती स्तवना पुरुषसूक्तें

vasudeva hashikesha madhava madhusudana | karitati stavana purushasukten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वासुदेवा हषिकेशा माधवा मधुसूदना । करिताती स्तवना पुरुषसूक्तें ॥१॥ पद्मनाम त्रिलोकेशा वामना शेषशायी । आह्माम कोणी नाहीं तुजवीण ॥२॥ जनार्दना हरि श्रीवत्स गरुडध्वजा । पाव अधोक्षजा आतां आह्मां ॥३॥ वराहा पुंडरीका नृसिंह नरां-तका । वैकुंठनायका देवराया ॥४॥ अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया । कृपेच्या अभया देईं आम्हां ॥५॥ नारायणा देवाध्यक्षा कैठभमंजना । करींरे मर्दना दुष्टाचिया ॥६॥ चक्रगदाशंखपाणी नरोत्तमा । पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या ॥७॥ रामा हयग्रीवा भीष्मा रौद्रा मेवाद्भवा । आश्रय भूतां सर्वां तुझा असे ॥८॥ श्रीधरा श्रीपति चतुर्बाहो मेघ:शामा । लेंकुरें आम्ही आम्हाम पाव त्वरें ॥९॥ नामा म्हणे ऐसें करितां स्तवन । तोषला भगवान क्षीराब्धींत ॥१०॥