भजनी मालिका
← भजनांकडे परत

वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्यें बिव्न झालें. ऐका

vasudeva det devaki bahin | lagnamadhyen bivna jhalen. aika

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वसुदेवा देत देवकी बहीण । लग्नामध्यें बिव्न झालें. ऐका ॥१॥ आकाशींची वानी सांगतसे कंसा । मानी हा भरंवसा बोलण्याचा ॥२॥ आठवा इचा पुत्र वधील तुजशी । ऐकोनी मानसीं क्रोधावला ॥३॥ घेऊनियां खड्‍ग माराया धांवला । हात तो धरीला वसुदेवें ॥४॥ देईन मी पुत्र सत्य माझें मानीं । ठेवा बंदीखानीं दूता सांगे ॥५॥ पुण्य सारावया भेटे देवऋषी । वधी बाळकांशी ठेवूं नको ॥६॥ होतांची प्रसूत नेऊनियां देत । साहाही मारीत दुराचारी ॥७॥ धन्य त्याचें ज्ञान न करीच शोक । वधितां बालक नामा म्हणे ॥८॥