भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाजवोनी वेणू पसरिलें जाळें । आम्हांसी न कळे कपटिया तूं

vajavoni venu pasarilen jalen | amhansi na kale kapatiya tun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाजवोनी वेणू पसरिलें जाळें । आम्हांसी न कळे कपटिया तूं ॥१॥ दुखवोनी सर्वां टाकियेलें वनीं । गेलासी वधुनी पारधिया ॥२॥ धरूनियां धीर न राहावे कृष्णा । देऊं मग प्राणा सकळिकां ॥३॥ सकळांच्या हत्या येती तुजवरी । नामा म्हणे हरि भेट आतां ॥४॥