भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाजचिली डांक चौक ठेवियला वो । ठायीं पंढरींचे विठठले तुज हाकारा केला वो

vajachili dank chauk theviyala vo | thayin pandharinche vithathale tuj hakara kela vo

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाजचिली डांक चौक ठेवियला वो । ठायीं पंढरींचे विठठले तुज हाकारा केला वो ॥१॥ रंगा येईंवो खेचरे विठाई सुंदरी वो । तुझीं पाउलें गोजिरीं कैं मी द्दष्टी देखेन वो ॥२॥ पाजळला दीपु फिटला अंधकारु वो । न लाचा उशीरु पांडुरंगे माउलीये वो ॥३॥ तमोगुणाचा रज जाळूनि धूप केला वो । उशिरु कां लाविला पांडुरंगे माउलीये वो ॥४॥ तनुमनाची मूद ठाकीन तुज वरोनी वो । ठैकुंठवासिनी पांडुरंगे माउलिये वो ॥५॥ अहंकार दैवतें झडपिलें नामयासी वो । येऊनियां रंगासी रंग राखीं आपुला वो ॥६॥