भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठ दुभतें नंदाघरीं माये

vaikunth dubhaten nandagharin maye

वैकुंठ दुभतें नंदाघरीं माये । तें पुण्य पान्हा ये यशोदेसी ॥१॥ तें रूप रूपस कांसवी प्रकाश । योगीजनमानस निवताती ॥२॥ सुंदर सुनीळ राजस गोपाळ । भक्तीसी दयाळ एक्या नामे ॥३॥ निवृत्ति गयनी मन ते चरणीं । अखंडता ध्यानीं तल्लीनता ॥४॥