भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाचेचेनि बळें बोलसी आगळें । मर्यादे वेगळें वायांविण

vachecheni balen bolasi agalen | maryade vegalen vayanvin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वाचेचेनि बळें बोलसी आगळें । मर्यादे वेगळें वायांविण ॥१॥ भ्रमलिस आरजे न पाह्सी आपणाकडे । धारिष्ट केवढें पाहें तुझें ॥२॥ नेईं आपला नामा काय चाड आम्हां । जरी आहे तुज भ्रम ममत्वाचा ॥३॥ पाहे पां पूर्वींचा कवणिये जन्मींचा । नकळे तुझा याचा ऋणानुबंध ॥४॥ तो सरला कींज उरला विचारी आपुला । हा तुज अंतरला कवण्या गुणें ॥५॥ येणें सांडिला संसार वेव्हार लौकिक । अविद्या अहंभाविक दोन्ही नाहीं ॥६॥ हा प्रपंचावेगळा नकळे याची लीला । लागालसे डोळा प्रेममुद्रा ॥७॥ ऐसी याची स्थिति देखोनियां डोळां । मज कां वेळोवेळां छळितेसी ॥८॥ जाणसी त्या परी बझावी वो यातें । जेणें सुखें तूंतें ओळखिला ॥९॥ याचेनि संसार चालविन म्हणोनी । ऐसी भ्रांती मनीं धरिलीं वायां ॥१०॥ नामा अंतरीं निमाला आत्मा असे उरला । तरंग निमाला जेवीं जळीं ॥११॥