भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठोनियां प्रात:काळीं । तुळस वंदावी माउली । तुळस संतांची साउली । मुगुटीं वाहिली विष्णूनें

uthoniyan prat:kalin | tulas vandavi mauli | tulas santanchi sauli | mugutin vahili vishnunen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उठोनियां प्रात:काळीं । तुळस वंदावी माउली । तुळस संतांची साउली । मुगुटीं वाहिली विष्णूनें ॥१॥ तुळस असे ज्याचे द्वारीं । लक्ष्मी वसे त्याचे घरीं । येवोनी श्रीहरि । क्रिडा करी स्वानंदें ॥२॥ तुळसीसी मंजुरा येतां । पळ सुटे यमदूतां । अद्वैत तुळस कृष्ण स्मरतां । नासे दुरित चित्ताचें ॥३॥ जे जे तुळसी घालिती उदक । ते नर पावती ब्रह्मसुख । नामा म्हणे पंढरीनायक । तुळसी जवळी उभा असे ॥४॥