भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठियेलें देव गोपाळ मंडळी । बैसले ते पाळी समाधीचे

uthiyelen dev gopal mandali | baisale te pali samadhiche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उठियेलें देव गोपाळ मंडळी । बैसले ते पाळी समाधीचे ॥१॥ निशीं सर्व कीर्तन वद्य माघमासीं । व्रत एकादशी गोदातीरीं ॥२॥ द्वादशी पारणें वैष्णवा सोडिती । बैसल्या त्या पंक्ती सिद्धेश्वरीं ॥३॥ सिद्धेश्वरीं पूजा केली चांगयानें । पात्रें नारायण टाकूं लागे ॥४॥ राही रखुमाई करिती पक्वानें । सोडितो पारणें चांगदेव ॥५॥ चांगदेवासंगें निवृत्ति मुक्ताई । बैसले ते पाही वैष्णवांत ॥६॥ नामा म्हणे आतां करावीं भोजनें । ताटें रखुमाईनें विस्तारिलीं ॥७॥