भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठिले विष्णव आटोपलें भोजन । केलेंअ आचमन भोगावतीं

uthile vishnav atopalen bhojan | kelena achaman bhogavatin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उठिले विष्णव आटोपलें भोजन । केलेंअ आचमन भोगावतीं ॥१॥ अवघ्यांनीं घेतला सोपान वटेश्वर । गोंदा महादा साचार विडे देती ॥२॥ निशिदिनीं कीर्तन केलें द्वादशी । वद्य त्रयोदशी मार्गशीर्ष ॥३॥ भोगावतीं केलें अवघ्यांनीं स्नान । चालिले सोपान समाधीसी ॥४॥ नामा म्हणे देवा स्थळ मनोहर । उठावले भार वैष्णवांदे ॥५॥