भजनी मालिका
← भजनांकडे परत

उफराटी माळ उफराटें ध्यान

upharati mal upharaten dhyan

उफराटी माळ उफराटें ध्यान । मनाचें उन्मन मूर्ति माझी ॥ १ ॥ तें रूप आवडे भोगिता साबडें । यशोदेसि कोंडें बुझावितु ॥ २ ॥ नहोनि परिमाण हरपलें ध्यान । आपणचि रामकृष्ण जाला ॥ ३ ॥ निवृत्तिची जपमाळा हे गोमटी । मन तें वैकुंठी ठेवियेलें ॥ ४ ॥