भजनी मालिका
← भजनांकडे परत

उघडिल्या दिशा उघडिलें गगन । पाहिलें वदन भास्कराचें

ughadilya disha ughadilen gagan | pahilen vadan bhaskarachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उघडिल्या दिशा उघडिलें गगन । पाहिलें वदन भास्कराचें ॥१॥ निवृत्तिराजातें कळवळा वाटे भारी । आतां आम्हां हरि आज्ञा द्यावी ॥२॥ जयजयकारें टाळयाअ पिटिती सकळ । नाचती गोपाळ तापीतीरीं ॥३॥ सकळांचे चित्तीं येतो कळवळा । मुक्ताई डोळां पाहिली नाहीं ॥४॥ नानापरि खेद करिती योगेश्वर लाविती पदर डोळियांसी ॥५॥ नामा म्हणे देवा कैसें आतां कांहीं । आम्हां मुक्ताई बोलली नाहीं ॥६॥