भजनी मालिका
← भजनांकडे परत

उघडली दृष्टी इंद्रिया सकट

ughadali drushti indriya sakat

रचनाकार: संत सोपान · अभंग
उघडली दृष्टी इंद्रिया सकट । वैकुंठीची वाटपंढरी जाणा ॥१॥ दृष्टीभरी पाहे दैवत । पूर्ण मनोरथ विठठलदेवे ।।२।। हाची मार्ग सोपा जनासी उघड | विषयाचे जाड टाकी परते ॥३॥ सोपान म्हणे गुफसी सर्वथा। मग नव्हे उत्तथा भक्तिपंथे ॥४॥