भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदित जालें मन आतां काय अनुमान । करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी

udit jalen man atan kay anuman | kari shighra prasthan adnya majhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उदित जालें मन आतां काय अनुमान । करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी ॥१॥ देवाचा हो कर धरोनी ज्ञानेश्वर । निघाला बाहेर योगिराज ॥२॥ मागें पुढें संत चालिले मिरवित । कौतुक पहात इहलोकीं ॥३॥ नारा विठा गोंदा माहादा विरक्त । परसा भागवत उभें तेथें ॥४॥ समुदाय वैष्णव मिळालासे भारी । महोत्सव गजरीं आरंभिला ॥५॥ नामा म्हणे गुज दाविलें श्रीहरी । धन्य आळंकापुरीं पुण्यभूमी ॥६॥