भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदास भरण खळ बुद्धीसि कारण । त्याचें परिहरण रामनाम

udas bharan khal buddhisi karan | tyachen pariharan ramanam

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उदास भरण खळ बुद्धीसि कारण । त्याचें परिहरण रामनाम ॥१॥ कामसंदीपन दोषआचरण । त्याचें परिहरण रामनास ॥२॥ दुर्वासना गहन दुर्बुद्धि आचरण । त्याचें परिहरण रामनाम ॥३॥ नामा ह्मणे कारण संसारतारण । जरी मनीं निधान रामनाम ॥४॥