भजनी मालिका
← भजनांकडे परत

उदर भरावया घेऊनियां सोंग । घरोघरीं बोंब उपदेशाची

udar bharavaya gheuniyan song | gharogharin bomb upadeshachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उदर भरावया घेऊनियां सोंग । घरोघरीं बोंब उपदेशाची ॥१॥ आपणा कळेना कळेना लोकां सांगे ज्ञान । धरूनियां ध्यान बक जैसा ॥२॥ आपण बुडाले आणिकां बुडविती । हात धरुनी जाती यमलोका ॥३॥ दुरी पंथ जाणे तया यमपुरी । पापाची शिदोरी बांधोनियां ॥४॥ विठा म्हणे काय करूं त्याच्या कपाळा । पापाचा कंटाळा न धरिती ॥५॥