भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभयतांनीं नमन केलें यथासांग । अर्थी पांडुरंग साह्म केला

ubhayatannin naman kelen yathasang | arthi pandurang sahma kela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उभयतांनीं नमन केलें यथासांग । अर्थी पांडुरंग साह्म केला ॥१॥ कळवळिले संत वैष्णवांचे भार । आणिक योगेश्वर स्फुंदताती ॥२॥ गरुडा हनुमंत विसोबा खेचर । लावितो पदर डोळियासी ॥३॥ निवृत्ति मुक्ताबाई चांगदेवासहित । परसा भागवत शोक करी ॥४॥ नामा म्हणे देवा खेद सिंधू लोटा । उठा आतां भेटा सोपानासी ॥५॥