भजनी मालिका
← भजनांकडे परत

उभयतां तेव्हां कलह करिताती । आण वाहातातां परस्परें

ubhayatan tevhan kalah karitati | an vahatatan parasparen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
उभयतां तेव्हां कलह करिताती । आण वाहातातां परस्परें ॥१॥ सोडूं जों पाहती सत्वर ग्रंथिका । न सुटे ब्रह्मादिकां कदाकाळीं ॥२॥ सोडितां सुटेना जाळितां जळेना । कापितां कापेना कांहीं केल्या ॥३॥ स्त्रियेलागीं तेव्हां भ्रतार बोलत । तुजसंगें मृत्यु मज आला ॥४॥ दोघेंहि रडत बिदीमाजी येती । कोल्हाळ करिती तयेवेळीं ॥५॥ गोकुळींचे जन डोळां पहाताती । जाऊन सांगती नंदालागीं ॥६॥ नामा म्हणे नंद बैसला चावडी । घेऊन आवदी कृष्णजीला ॥७॥