भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरी लागे छंदू हरिनामाचा

tute mayajal vighade bhavasindhu | jari lage chhandu harinamacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरी लागे छंदू हरिनामाचा ॥१॥ येर कर्मधर्म करितां या कलीं । माजी कोण बळी तरला सांगा ॥२॥ न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥३॥ नव्हे अनुष्ठान न कळे ब्रह्मज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥ न साधे हा योग न करवे वैराग्य । साधा भक्ति भाग्य संतसंगें ॥५॥ नामा म्हणे साधन न लगे आणिक । दिधली मज भाक पांडुरंगें ॥६॥