भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुतारे भोंवारें वाजंत्रें वाजती । अप्सरा नाचती थैयथैय

tutare bhonvaren vajantren vajati | apsara nachati thaiyathaiy

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुतारे भोंवारें वाजंत्रें वाजती । अप्सरा नाचती थैयथैय ॥१॥ झणण झणण झांजा गर्जताती । नौबदा वाजती धोधोधोधो ॥२॥ सुरवर येत विमानाची दाटी । करिती पुष्पवृष्टि देवावरी ॥३॥ नारद तुंबर किन्नर गंधर्व । व्योमीं गाती सर्व सप्त-स्वरीं ॥४॥ कीर्तनाचा घोष नामाचा गजर । मृदंग सुस्वर वाजताती ॥५॥ केशरी गंधाचे टिळक लावी भाळा । घाली पुष्पमाळा द्विजांकंठीं ॥६॥ घरोघरीं नंद धादी शर्करेशी । वस्त्रें सुह्लदांसी नांआ ह्मणे ॥७॥