भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुर्येमध्यें माझा अखंड रहीवास

turyemadhyen majha akhand rahivas

तुर्येमध्यें माझा अखंड रहीवास । निवृत्ति म्हणे अविनाश तूर्या करी ॥१॥ स्थुळदेह निमतां सूक्ष्म उरतां । कारणीं हारपतां कैसें झाले ॥२॥ ज्ञानदेव म्हणे महाकारणीं नांदे । निवृत्तीने आनंदे दाखविलें तें ॥३॥