भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं तो माझें मी तो तुझें

tun to majhen mi to tujhen

तूं तो माझें मी तो तुझें । ऐक्य जालें तेथें कैचें दुजें ॥१॥ तूं तो मी गा मी तो तूं गा । अज्ञानें बापुडीं नेणती पैं गा ॥२॥ निर्गुण होतें तें गुणासि आलें । अज्ञान निरसूनि एकचि जालें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे परतूनि पाही । जीवाचा जीवनु कवणें ठायीं ॥४॥