भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही सर्व देव मिळोनी पावावें

tumhi sarva dev miloni pavaven

रचनाकार: संत रामदास · अभंग
तुम्ही सर्व देव मिळोनी पावावें। मज वेगीं न्यावें परब्रहमीं परब्रह्मीं न्यावें संतमहानुभावें। मज या वैभवें चाड नाहीं चाड नाही एका निर्गुणावांचोनी। माझे ध्यानीं मनीं निरंजन निरंजन माझा मज भेटवावा। तेणें होय जीवा समाधान समाधान माझें करा गा सर्वहो। तुम्हांसी देव हो विसरेना विसरेना देह चालतो तोंवरी। बाह्य अभ्यंतरी दास म्हणे।