भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमच्याचि चरणाचा महिमा । नेणा तुम्ही पुरुषोत्तमा

tumachyachi charanacha mahima | nena tumhi purushottama

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुमच्याचि चरणाचा महिमा । नेणा तुम्ही पुरुषोत्तमा ॥१॥ आम्हा दासांचें जीवन । घडे अमृताचेचि पान ॥२॥ वृक्ष नेणति फळाची गोडी । भोक्तेचि जाणती ते आवडी ॥३॥ निळा म्हणे जाणति संत । भक्त तुमचे ते भाग्यवंत ॥४॥