भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचीया बळें तुम्हांसवें खेळावें । आपल्या नाडावें मतिवादें धांवता

tumachiya balen tumhansaven khelaven | apalya nadaven mativaden dhanvata

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुमचीया बळें तुम्हांसवें खेळावें । आपल्या नाडावें मतिवादें धांवता ॥१॥ याचिसाठीं क्षणक्षणां विनंति करीं । ठेवावें मजवरी अवलोकन कृपेचें ॥२॥ तुम्हांसी न भजतां योगयाग सायास । तैंचि भवपाश होती फळें देऊनी ॥३॥ निळा म्हणे जप तप ध्यान संपत्ति । कृपेंविण तुमचे होती बंधना मूळ ॥४॥