भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळसी पुष्पांहूनि आगळी । वृंदावनीं ते मिरवली । देवें मस्तकीं वंदिली । वंद्य झाली तिहीं लोकां

tulasi pushpanhuni agali | vrundavanin te miravali | deven mastakin vandili | vandya jhali tihin lokan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुळसी पुष्पांहूनि आगळी । वृंदावनीं ते मिरवली । देवें मस्तकीं वंदिली । वंद्य झाली तिहीं लोकां ॥१॥ तुळसी वंदाची माउली । अरे हे संतांची साउली । तुळसीपासीं वनमाळी । सदा रहात असे ॥२॥ तुळसी दळ भूमीवरी पडिलें । तें जरी मस्तकीं वंदिलें । कोटी तीर्थस्नान केलें । एवढें फळ नामा म्हणे ॥३॥