भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळसी बेल पुष्पें समर्पिलीं वर । पाहाती ऋषीश्वर पहिली पूजा

tulasi bel pushpen samarpilin var | pahati rushishvar pahili puja

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुळसी बेल पुष्पें समर्पिलीं वर । पाहाती ऋषीश्वर पहिली पूजा ॥१॥ नारा विठा गोंदा पाठविलाअ महादा । झाडावया शेजा पुढें जाले ॥२॥ सभोंवतीं जागा झाडिली निर्मळ । अनादि हें स्थळ निवृत्तिराजा ॥३॥ सभोंवते दीप लाविले समाधी । म्हणती पूजा आधीं केली असे ॥४॥ अनादि हे पूजा केली म्हणती संत । आतां कोणी आंत उतरूं नये ॥५॥ नामा म्हणे हरि काय स्थळ चांगलें । दुर्वा दर्भ फुलें वाहियेलीं ॥६॥