भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळशीचे बनीं। जनी उकलीत वेणी

tulashiche banin| jani ukalit veni

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
तुळशीचे बनीं। जनी उकलीत वेणी ॥१॥ हातीं घेऊनियां लोणी डोई चोळी चक्रपाणी॥२॥ माझे जनीला नाहीं कोणी म्हणूनी देव पाली पाणी।।३॥ जनी सांगे सर्व लोकां न्हाऊं पाली माझा सखा ॥४॥