भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुळशीचे बनीं । जनी उकलीत वेणी

tulashiche banin | jani ukalit veni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुळशीचे बनीं । जनी उकलीत वेणी ॥१॥ हातीं घेऊनियां लोणी । डोई चोळी चक्रपाणी ॥२॥ मझे जनीला नाहीं कोणी । म्हणुनी देव घाली पाणी ॥३॥ जनी सांगे सर्व लोकां । न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥