भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझ्या प्रेमाचे कारणे । म्हणे म्यां घेतलें धरणें

tujhya premache karane | mhane myan ghetalen dharanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझ्या प्रेमाचे कारणे । म्हणे म्यां घेतलें धरणें ॥१॥ विठा देगा झडकरी । मी तर न सोडीं निर्धारीं ॥२॥ शीर फोडीन कर्वती । नये तुज काकुळती ॥३॥ देह घालीन गोराजनीं । मोकलिसी मज लागोनी ॥४॥ तुझे द्वारीं देईन प्राण । तरी तूं पाहासी निर्वाण ॥५॥ विठा म्हणे पंढरिराया । आम्हा शिणवूं नको काया ॥६॥