भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझेनि बळें मांडली फळी

tujheni balen mandali phali

तुझेनि बळें मांडली फळी । तुवां जवळी असिलें पाहिजे ॥१॥ ऐसिये जुंझी घालिसी मज । काकुलती तुज नाहीं आतां ॥२॥ रणभूमीं आला रणवट घातला । पाहो जों लागला न देखे कांहीं ॥३॥ ज्ञानदेवो म्हणे उफराटें पाहाणें । खुंटलें येणेजाणें येचि भेटी ॥४॥