भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझें नाम म्हणतां सुलभ अनंता । दुर्लभ म्हणतां अंतकाळीं

tujhen nam mhanatan sulabh ananta | durlabh mhanatan antakalin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुझें नाम म्हणतां सुलभ अनंता । दुर्लभ म्हणतां अंतकाळीं ॥१॥ तैसें तुवां मज केशवा करावें । ह्रदयीं भेदावें नाम तुझें ॥२॥ मुके पशु पक्षी वृक्ष आणि पाषाण । तया नारायणा गति कैसी ॥३॥ नामा म्हणे कैसें केशवा सांगणें । अज्ञानी ते नेणें कवणेंपरी ॥४॥