भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुझे पवाडे सांगतां तुजपुढें

tujhe pavade sangatan tujapudhen

तुझे पवाडे सांगतां तुजपुढें । मुक्तीची कवाडे उघडती ॥१॥ नाहीं जातिकुळ म्यां तुज पुसिलें । पन मावळलें देखिनिया ॥२॥ तुझें तुज पुसतां लाजिरवाणें । तरि हांसति पिसुणें प्रपंचाचीं ॥३॥ उगवितां भलें कीं नुगवितां सांपडलें । ज्ञानदेवो बोले निवृत्तीसी ॥४॥