भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुज काय देवा न पुरतें आलें । विश्वासें ठेविलें अभिलाषंसी

tuj kay deva na puraten alen | vishvasen thevilen abhilashansi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुज काय देवा न पुरतें आलें । विश्वासें ठेविलें अभिलाषंसी ॥१॥ लाजिरवाणें नको करूं देवा आतां । देईंगा कृपावंता नामप्रेम ॥२॥ शरणागता वज्रपंजर म्हणवीसी । तरी कां तूं न देसी आम्हां आमुचें ॥३॥ माझ्या नामयानें जन्मोनि जोडिलें । तें देगा वहिलें म्हणे विठा ॥४॥