भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिविधतापें प्राणी होताती संतप्त । शीतळ करीत कथामृतें

trividhatapen prani hotati santapta | shital karit kathamruten

रचनाकार: संत नामदेव · अभंग
त्रिविधतापें प्राणी होताती संतप्त । शीतळ करीत कथामृतें ॥१॥ अमृतापरीस तुझी कथा अधिक । सांगतसे ऐक देव- राया ॥२॥ स्वर्गीं जें अमृत प्राशन करिती । पुण्य सरल्या येती मृत्यु लोकां ॥३॥ तुझी कथा देत अच्युत पदासी । न विचारीं मा-नसीं याति कांहीं ॥४॥ नाहीं चतुराई बोबडे हे बोल । संतोषे विठ्ठल नामा ह्मणे ॥५॥