भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवनींचें जीवन कीं अमरांचें ठेवणें । कैसें भाग्य लहाणे लक्ष्मी़चे

tribhuvaninchen jivan kin amaranchen thevanen | kaisen bhagya lahane lakshmiche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
त्रिभुवनींचें जीवन कीं अमरांचें ठेवणें । कैसें भाग्य लहाणे लक्ष्मी़चे ॥१॥ धन्य गौळियांचें धन्य धन्य जिणें । ज्या घरीं खेवणें परब्रह्म ॥२॥ अंगें खेळवणें परब्रह्म गोळुजणें । लीला सामावणें रोमरंध्रीं ॥३॥ नाना म्हणे तें दैवचि कारण । झालें खेळवणें परब्रम्ह ॥४॥