भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभुवना परतें दाविसी दुरी

tribhuvana paraten davisi duri

त्रिभुवना परतें दाविसी दुरी । आधीं तूं आपुली शुध्दी करी । उदयो अस्तु कवणिये घरीं । पिंडा माझारीं सांग बापा ॥१॥ जाग्रतीमध्यें कवण जागत । सुषुप्ती मध्यें कवण निद्रिस्त । दोघे भ्रमलिया स्वप्न देखत । जीव कीं मन सांग पा रे ॥२॥ जाग्रति वरुन काढीं चेतना । सुषुप्ति मध्यें रिघता ज्ञाना । दोन्ही चेईलिया स्वप्ना । मग अनुवादती कवण ॥३॥ इंद्रीयें सूत्रें दारें दाटली । जागत होती तें काय झालीं । सांग पा कवणें ठाई लपालीं । मग मिळाली कवणे ठाई ॥४॥ शब्दातें नाइकती श्रवण । पहात पहात डोळे जाले हीन । नासाग्रीं ठेवूनियां सुमन । परि नेणिजे परिमळ ॥५॥ पाहेंपां येथें अनुवादु काईचा । मी माजी हरपली खुंट्ली वाचा । ज्ञानदेव ह्मणे सदगुरु साचा । अढळपदीं बैसविले ॥६॥