भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिभंगी देहुडे उभे वृंदावनीं । वेणू चक्रपाणी वाज-वितो

tribhangi dehude ubhe vrundavanin | venu chakrapani vaj-vito

रचनाकार: संत नामदेव · अभंग
त्रिभंगी देहुडे उभे वृंदावनीं । वेणू चक्रपाणी वाज-वितो ॥१॥ तयावरी गायी टाकिताती माना । बाळें स्तनपाना विसरती ॥२॥ सर्प आणी नाग मुंगूसें बैसती । जळेंही वाहाती विस-रलीं ॥३॥ हस्ती सिंह एके ठावीं बैसताती । भ्रमर भूलती वेणुनादें ॥४॥ विंचरिती वेणी तेथें राहे फणी । करितां भोजनीं ग्रास मुखीं ॥५॥