भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिहीं त्रिगुणीं वोतिलें त्रिपुटिसि गोंविलें

tihin trigunin votilen triputisi gonvilen

तिहीं त्रिगुणीं वोतिलें त्रिपुटिसि गोंविलें । आणुनी बांधिलें चर्मदेहीं ॥१॥ न सुटतां शिणताहे भवति वास पाहे । प्रपंच मोहताहे काय करुं ॥ध्रु०॥ कृष्णनाम मंत्रु सुटे । विषय पप्रंचु तुटे । मोहनमुद्रा निघोटे वैकुंठ रया ॥२॥ सावधपणे विरुळा जाणें तेथिंचि कळा । विज्ञानपणें सोहळा निमथा गातुं ॥३॥ ज्ञानदेव सांगतु हरि पंथें मुक्तिमातु । एकतत्त्व सांगातु जनींवनीं ॥४॥