भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिहीं लोकीं फुटलीं हांक । वैकुंठलोकापर्यंत

tihin lokin phutalin hank | vaikunthalokaparyant

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तिहीं लोकीं फुटलीं हांक । वैकुंठलोकापर्यंत ॥१॥ भेटों गेला पुंडलिकांसी । हदयनिवासी जगाचा ॥२॥ दोषियां पापियां उध्दरीत । आणि हाकांरित भाविकां ॥३॥ निळा म्हणे ठेवुनी हात । कटावरी तिष्ठत विटे उभा ॥४॥