भजनी मालिका
← भजनांकडे परत

तिही त्रिपुटीचे वाडेरे

tihi triputiche vadere

तिही त्रिपुटीचे वाडेरे । सवालक्ष चरावया जायरे । ते दैत्यापाठी हुंबरत लागेरे । भक्ता घरीं दुभे सानुरागेरे कान्हो ॥१॥ तिचें नाम शांभवी आहेरे । तिची रुपरेखा कायरे कान्हो ॥२॥ येकी चौमुखी गाय पाहेरे । तिचा विस्तार बहु आहेरे । तिच्या नाभिकमळीं जन्म वासु सांगेरे । तिसी आदि पुरुषु बापमायेरे कान्हो ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु पाहीरे । ते भक्ता ओळली आहेरे । ते दोहतां भरणा पाहेरे । चारी धारा वर्षत आहेरे कान्हो ॥४॥