भजनी मालिका
← भजनांकडे परत

थिल्लर तें नेणे सागराचा अंत । मुंगीस अग्नींत रीघ नाहीं

thillar ten nene sagaracha ant | mungis agnint righ nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
थिल्लर तें नेणे सागराचा अंत । मुंगीस अग्नींत रीघ नाहीं ॥१॥ श्वान काय जाणे मेरूचें प्रमाण । कोसळल्या गगन न कळे त्यास ॥२॥ अंध काय जाणे कैसा उगवे दीन । पाषाणा पर्जन्य नकळे जेंवी ॥३॥ देहवंत जीव काय जाणे देव । नामा ह्मणे भाव काय तेथें ॥४॥