भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेऊनियां भाव तुमचिये चरणीं । बैसेन श्रवणीं वैष्णव करितां कीर्तन

theuniyan bhav tumachiye charanin | baisen shravanin vaishnav karitan kirtan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ठेऊनियां भाव तुमचिये चरणीं । बैसेन श्रवणीं वैष्णव करितां कीर्तन ॥१॥ याचिपरी सार्थक हा करीन काळ । जाऊं नेदी निर्फळ ऐसें आयुष्य नरदेह ॥२॥ यथामती वर्णीन तुमचे कीर्तिपवाडे । नाचोनी बागडे नाचोनी बागडे निर्लज्ज होउनी मानसीं ॥३॥ निळा म्हणे हेंचि आर्त निरंतर माझें । चरण यासी साक्ष तुझे पंढरीनाथा ॥४॥