भजनी मालिका
← भजनांकडे परत

तें सुख सांगतां वाचे पडे मौन

ten sukh sangatan vache pade maun

रचनाकार: बहिणाबाई · अभंग
तें सुख सांगतां वाचे पडे मौन । जाणता ते धन्य गुरुभक्त ॥ १ ॥ झालासे आनंद इंद्रियाचे द्वारीं । बैसलें शेजारीं चैतन्याचे ॥ २ ॥ घट हा बुडावा जैसा डोहाआंत । न फुंटतां ओतप्रोत पाणी ॥ ३ ॥ बहिणी म्हणे तैसें झालें माझें मना । तुकाराम खुणा ओळखी त्या ॥ ४ ॥